[mumbai] - दिवाळीचा लाडू झाला महाग

  |   Mumbainews

लोगो - आली दिवाळी

..................

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

अतिरिक्त व लांबलेल्या पावसाचा यंदा तूरडाळ वगळता सर्वच डाळींना फटका बसला आहे. हरभरा डाळीच्या किमती वाढत असल्याने ऐन दिवाळीत लाडू महागणार आहे. एकूणच यंदा दिवाळीचा फराळ सर्वसामान्यांसाठी महाग असेल, असे चित्र आहे.

दिवाळीतील फराळ तयार करण्यासाठी प्रामुख्याने विविध डाळींचा उपयोग होतो. हरभरा डाळीच्या बेसनापासून तयार केला जाणारा लाडू खवय्यांच्या मोठ्या पसंतीचा असतो. यामुळे त्याची मागणी सर्वाधिक असते. मात्र आता बाजारात हरभरा डाळ व बेसनाच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. पण त्या तुलनेत पीक कमी असल्याने पुढील आठवडाभरात हरभरा डाळीचे भाव भडकण्याची शक्यता आहे.

डाळींचे निर्यातदार असलेले प्रताप मोटवानी यांनी 'मटा' ला सांगितले की, 'पावसाळा संपत आला की हरभऱ्याचे पीक घेतले जाते. त्याची डाळ जानेवारीनंतर बाजारात येते. पण यंदा पावसाळा लांबल्याने अनेक भागात अद्याप हे पीक घेण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदा पीक कमी येण्याची चिन्हे आहेत. यामुळे यावर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात बाजारात आलेली डाळच पुढील वर्षी किमान मार्चपर्यंत पुरवावी लागणार आहे. त्यात आता दिवाळीनिमित्त मागणी वाढत असल्याने सध्या असलेली डाळ आता महाग होत आहे.'...

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/7NkHHgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬