[mumbai] - फडणवीसांच्या मंत्र्यांची संपत्ती १४२ कोटींनी वाढली

  |   Mumbainews

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील विद्यमान १८ मंत्र्यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिलीय. या मंत्र्यांनी उमेदवारी दाखल करताना प्रतिज्ञापत्रातून आपली संपत्ती जाहीर केलीय. या मंत्र्यांची संपत्ती १४२ कोटी ५० लाखांनी वाढलीय. प्रजा फाउंडेशनने यासंदर्भात केलेलं विश्लेषण समोर आलंय.

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या १८ मंत्र्यांना भाजपने उमेदवारी दिलीय. या मंत्र्यांनी दाखल केलेल्या आताच्या प्रतिज्ञापत्राचा आणि गेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राचा अभ्यास प्रजा फाउंडेशनने केलाय. यात गेल्या पाच वर्षांत या मंत्र्यांची संपत्ती ८० टक्क्यांनी वाढल्याचं समोर आलंय. या मंत्र्यांची संपत्ती २०१४मध्ये १७९ कोटी ८० लाख होती. आता वाढ होऊन ही संपत्ती ३२२ कोटी ५० लाखांवर गेलीय. भ्रष्टाचारातून किंवा गैरकारभारातून मंत्र्यांची संपत्ती वाढलीय, असं म्हणून चालणार नाही. कायदेशीर मार्गानेही वाढू शकते. तसंच मालमत्तेची किंमत वाढल्यामुळेही होऊ शकते, असं प्रजा फाउंडेशनचे अध्यक्ष मिलिंद म्हसकर यांनी सांगितलं....

फोटो - http://v.duta.us/Ey54tQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/sUlUiwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬