[mumbai] - 'रेरा'चा व्याप वाढला

  |   Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: गृहनिर्माण प्रकल्पांतील अनियमिततेला चाप लावण्यासाठी २०१६ साली अस्तित्वात आलेला 'रेरा' कायदा देशपातळीवर चांगलाच रुजू लागला आहे. आज दोन वर्षांनीही या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्राने पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे.

या कायद्याअंतर्गत गृहनिर्माण प्रकल्पांची नोंद करण्याचा टक्का वाढला आहे. या कायद्याखाली सप्टेंबर २०१८ पर्यंत ३२ हजार ३०६ प्रकल्पांची नोंदणी झाली होती. ५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत हा आकडा ४५ हजार ३०७ इतका झाला आहे. कायद्याच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश ही पाच राज्ये आघाडीवर आहेत. या पाच राज्यांत मिळून प्रकल्प नोंदणीचे प्रमाण ८१ टक्के आहे. गृहनिर्माण प्रकल्पात मुख्य भूमिका बजावणाऱ्या एजंटांची नोंदणीही वाढली असून गत वर्षीच्या तुलनेत यंदा ५४ टक्के वाढ आहे. आतापर्यंत ३५ हजार ६४४ एजंटांची प्रकल्पाअंतर्गत नोंद झाली आहे. आसाम, चंडिगढ, दमण व दीव तसेच पुदुच्चेरी या राज्यांमध्ये यावर्षी पहिल्यांदाच या कायद्याची अंमलबजावणी होत आहे. गृहनिर्माण प्रकल्पात बिल्डरांच्या विरोधात देशभरात विविध राज्यांतील 'रेरा' प्राधिकरणाकडे २७ हजार ९७० तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक ४१ टक्के तक्रारी उत्तर प्रदेशातील आहेत....

फोटो - http://v.duta.us/4uX2zgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/MwhbaAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬