[nagpur] - ईव्हीएम सील, आल्या नव्या मशिन

  |   Nagpurnews

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएमच्या डेटा मशिनी विधानसभेसाठी मात्र कोणत्याही कामात येणार नाहीत. त्या आता हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकांचा पुरावा म्हणून सील करण्यात आलेल्या आहेत.

विदर्भातील दहा लोकसभा मतदार संघात निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात सर्वाधिक पाच याचिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात आहेत. प्रत्येक याचिकेत 'ईव्हीएममध्ये मतदानाच्या दिवशी तांत्रिक बिघाड आला होता, मतमोजणीत एकूण झालेले मतदान आणि मोजलेली मते त्यात तफावत आढळून आली, तर व्हीव्हीपॅट आणि मोजण्यात आलेली मते हे एकसमानच आहे काय, ते तपासण्यात यावेत', असे मुद्दे होते. त्यामुळे त्या प्रत्येक याचिकेत मतांना रेकॉर्ड करणाऱ्या मशिनी प्रमुख पुरावा म्हणून बघण्यात येत आहेत. साधारणपणे कायद्यातील तरतुदीनुसार निवडणूक निकालानंतर ४५ दिवस निवडणुकीच्या संदर्भातील पुरावे हे जतन करण्यात येतात. परंतु, आता निवडणूक याचिका दाखल झालेल्या असून त्यावर हायकोर्टाने नोटीस देखील काढलेल्या आहेत. त्यामुळे दहा लोकसभा मतदार संघात वापरण्यात आलेल्या सर्व मशिनी या न्यायालयीन पुरावा झाल्या असून त्यांना संरक्षित करण्यात आले आहे. त्यास्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत त्या मशिनी आता वापरण्यात येणार नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून पर्यायी मशिनी विदर्भातील दहा जिल्ह्यांसाठी मागवल्या आहेत. त्यांवर आता मतदान आणि नंतर मतमोजणी होणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/GRPLWAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬