[nashik] - बहुजन समर्थक 'वंचित'

  |   Nashiknews

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वंचित बहुजन आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेली खासदार प्रकाश आंबेडकर यांची सभा त्यांची तब्येत बिघडल्याने ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे सभेसाठी जमलेल्या समर्थकांचा हिरमोड झाला.

वंचित बहुजन आघाडीची सभा मंगळवारी दुपारी तीन वाजता ठक्कर डोम येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या सभेसाठी जिल्ह्यातील इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार लकी जाधव, दिंडोरीचे उमेदवार अरुण गायकवाड, सिन्नरचे उमेदवार विक्रम कातकाडे, निफाडचे उमेदवार संतोष आहेरराव, नाशिक पूर्वचे उमेदवार संतोष नाथ, नाशिक मध्यचे उमेदवार संजय साबळे, देवळाली मतदारसंघाचे उमेदवार गौतम वाघ, नाशिक पश्चिमचे उमेदवार डॉ. डी. एल. कराड या आठ उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे सातपूर, अंबड, सिन्नर भागातील कारखान्यांच्या कामगार संघटनांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाहेरगावांहून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी दुपारी दीड वाजेपासूनच सभास्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. सभास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पार्किंगची विशेष व्यवस्थाही करण्यात आली होती. नाशिक पश्चिम मतदारसंघातील उमेदवार डॉ. डी. एल. कराड यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. त्यांचे भाषण संपताच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी व्यासपीठावर येऊन प्रकाश आंबेडकर यांची तब्येत बिघडल्याने ही सभा रद्द झाल्याची घोषणा केली. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित समर्थकांचा हिरमोड झाला. आंबेडकरांचे विचार ऐकायला न मिळाल्याने निराशेचे भाव अनेकांच्या चेहऱ्यांवर दिसून आले....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/MPHQwwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬