[navi-mumbai] - उरणमध्ये बंडखोरांमागे भाजपची ताकद

  |   Navi-Mumbainews

तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

उरण विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली असली तरी भाजपचे सर्व पदाधिकारी बालदी यांच्या पाठिशी असल्याचे चित्र दिसत आहे.

उरणमध्ये शिवसेनेच्या विद्यमान आमदार असतानाही भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश बालदी यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. परंतु शिवसेनेच्या पहिल्याच यादीत विद्यमान आमदार मनोहर भोईर यांची उमेदवारी जाहीर झाली. युती नसताना २०१४ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणाऱ्या बालदी यांनी बंडाचा झेंडा फडकवून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केली म्हणून पनवेलचे भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात शिवसेनेने बंडखोरी केली, ती नंतर मागे घेण्यात आली. उरणमध्ये मात्र भाजपच्या बालदी यांनी उमेदवारी कायम ठेवली. युतीचे उमेदवार शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी भाजपच्या बंडखोरीची तक्रार थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. बंडखोर उमेदवारासह भाजपचा कोणताही पदाधिकारी युतीचा प्रचार करीत नसल्याच्या तक्रारीनंतर भाजपने बंडखोराची हकालपट्टी केली. एकट्या बालदी यांची हकालपट्टी केली असली तरी उरण तालुक्यातील इतर भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी युतीचा धर्म न पाळणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. विशेष म्हणजे उरण विधानसभा मतदारसंघात पनवेल तालुक्यातील मोठा भाग येतो, या भागातील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकाऱ्यांनीदेखील शिवसेनेच्या मनोहर भोईर यांच्याशी असहकार पुकारला आहे. उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवेंद्र कोळी, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा यांच्यासह सर्व पदाधिकारी बंडखोर महेश बालदी यांच्या व्यासपीठावर वावरतात. बालदी यांच्या पाठिशी भाजपची छुपी ताकद असल्याचे दिसते. त्यामुळे उरण मतदारसंघात शिवसेना, महाआघाडीचे उमेदवार विवेक पाटील आणि बंडखोर उमेदवार महेश बालदी यांच्यात तिरंगी लढत रंगतदार बनली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/fhGASgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬