[navi-mumbai] - एक कोटी नोकऱ्या देऊ

  |   Navi-Mumbainews

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणे, पायाभूत सुविधांमध्ये ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, एक कोटी नोकऱ्यांची निर्मिती, प्रत्येक बेघराला घर, शेतीसाठी दिवसा १२ तास वीज, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी असे १६ प्रमुख संकल्प भाजपने केले आहेत. भाजपच्या या संकल्पपत्राचे पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचा शब्दही भाजपने मराठीजनांना दिला आहे.

'पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्राची स्थिती अतिशय विदारक होती. भ्रष्टाचार वाढला होता. अकार्यक्षमतेमुळे राज्यापुढे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या पाच वर्षांत जनतेने भ्रष्टाचारमुक्त, सुशासनयुक्त, पारदर्शक, कार्यक्षम सरकारचा अनुभव घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान केले,' असे या वेळी नड्डा यांनी सांगितले. तर, 'कृष्णा, कोयना या नद्यांचे, तसेच पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा कार्यक्रम येत्या पाच वर्षांत राबवू,' असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 'मराठवाड्यासाठी ११ धरणे एकमेकांना लूप पद्धतीने जोडून या भागाची पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर करण्याची योजना आम्ही आखली आहे. एक कोटी कुटुंबांना महिला बचतगटांशी जोडून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही करू,' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आगामी पाच वर्षांत राज्यातील युवकांसाठी एक कोटी नोकऱ्यांची निर्मिती, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके पाच वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासनही भाजपने दिले आहे. विशेष म्हणजे या संकल्पपत्रातील अनेक आश्वासने ही गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची तंतोतंत कॉपी आहे....

फोटो - http://v.duta.us/RuQCggAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/iBJXkgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬