[navi-mumbai] - नरेंद्र-देवेंद्रची जोडी हिट, आम्ही एकावर ११ : मोदी

  |   Navi-Mumbainews

पनवेल, नवी मुंबईः दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ही जोडी सुपरहिट झालीय. नरेंद्रला तुम्ही दिल्लीत पुन्हा सत्तेत विराजमान केलं. तसंच देवेंद्र यांना पुन्हा महाराष्ट्राची सत्ता द्यावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी केलं. पनवेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. यासभेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत तुम्ही केंद्राच्या सत्तेवर पुन्हा नरेंद्रला बसवलं. आता महाराष्ट्रातही हाच किस्तान देवेंद्र सत्तेत बसवून गिरवावा. दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र हा फॉर्म्युला गेल्या पाच वर्षात हिट ठरलाय. यामुळे पुढील काळात हा फॉर्म्युला महाराष्ट्राला विकासात नव्या उंचीवर नेईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

एक आणि एक दोन नाही तर एकावर एक अकरा

नरेंद्र आणि देवेंद्र जेव्हा एकसाथ येतात तेव्हा एक अधिक एक दोन होत नाही. तर नरेंद्र आणि देवेंद्र एकसाथ येतात त्यावेळी एकावर एक ११ होतात. याच सूत्रानुसार महाराष्ट्राला डबल इंजीन लागल्याने राज्याच्या विकासाची गाडी ११ पट शक्तीने वेगात धावत आहे. यामुळे २१ ऑक्टोबरला मतदान करताना या डबल शक्तीचा विचार लक्षात ठेवा, असं आवाहन मोदींनी मतदारांना केलं....

फोटो - http://v.duta.us/t3mVwgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/93eOHQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬