[navi-mumbai] - नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पोलिस सज्ज

  |   Navi-Mumbainews

खारघरला पोलिस छावणीचे स्वरूप; वाहतुकीत बदल

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सायंकाळी खारघर सेक्टर-२९मधील सेंट्रल पार्कलगतच्या मैदानात आयोजित प्रचारसभेसाठी उपस्थित रहाणार आहेत. या प्रचारसभेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित राहण्याचा अंदाज असल्याने या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत व नियंत्रित राहावी, यासाठी नवी मुंबई वाहतूक शाखेने बुधवारी दुपारी १२ ते सायंकाळी ७ या कालावधीत या भागातील काही मार्गांवर प्रवेशबंदी तसेच अंशत: बदल, तर काही ठिकाणी नो पार्किंग घोषित केली.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे केंद्र व राज्यातील इतर अनेक महत्त्वाच्या व्यक्ती बुधवारी नवी मुंबईत खारघर येथे येणार आहेत. या प्रचारसभेसाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदायसुद्धा येणार असल्याने खारघर भागात वाहतूककोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई वाहतूक शाखेने खारघर येथील गोल्फ क्लब ते ओवा कॅम्प जंक्शन ते सीआयएसएफ दरम्यानच्या मार्गावर प्रवेश बंद केली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना उत्सव चौकातून ग्रामविकास जंक्शन येथून उजवीकडे वळण घेऊन ग्रीन हेरिटेज इमारतीसमोरील सर्कलवरून मुर्बी गाव येथून डावीकडे वळण घेऊन रांजणपाडा-पेठपाडा येथे जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/aUmPPQAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬