[navi-mumbai] - निवडणुकीच्या धामधुमीत 'ड्राय डे'चाही प्रचार

  |   Navi-Mumbainews

दुकानदार, हॉटेलचालकांकडून विशेष खबरदारी

म. टा. वृत्तसेवा, पनवेल

निवडणुकीच्या रणांगणात उभे राहिलेल्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी प्रचार करावा लागतो. प्रचारासाठी रात्रंदिवस कमी पडतात. ऐन निवडणुकीच्या काळात चार दिवस वेगवेगळ्या वेळेत आलेल्या 'ड्राय डे'मुळे तळीरामांच्या सोयीसाठी बारमालक, हॉटेल व्यावसायिकांनी 'ड्राय डे'चाही प्रचार सुरू केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दारूविक्री करणारी दुकाने आणि परमिट रूम बंद राहणार आहेत. १९ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचपासून दुकाने बंद राहतील. २० तारखेला पूर्ण दिवस दुकाने, हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश आहेत. २१ तारखेला राज्यात मतदान होते असून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर दारूविक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे. २३तारखेला दारूविक्री करण्यास मुभा राहील. त्यानंतर २४ तारखेला विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दारूविक्री करण्यास पूर्ण दिवस बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काढलेल्या आदेशात या वेळा नमूद करण्यात आल्या आहेत. दारुविक्रीची दुकाने, हॉटेल, लेडीज सर्व्हिस बार आदी बंद असल्याच्या तारखा ग्राहकांना माहिती असाव्यात, याची काळजी घेऊन व्यावसायिकांनी 'ड्राय डे'च्या तारखांचादेखील पद्धतशीरपणे प्रचार सुरू केला आहे. दुकानांसमोर दारूविक्री बंदच्या वेळा असलेले स्टिकर लावून 'जनजागृती' केली जात आहे. 'विधानसभा निवडणूक ड्राय डे, ड्राय डे' असा संदेश असलेले फलक समाजमाध्यमांवर जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत. पनवेलमध्ये अनेक ठिकाणी दुकानांच्या बाहेर, हॉटेलबाहेर लावण्यात आलेल्या या संदर्भातील सूचना चर्चेचा विषय ठरत आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/UZLxSwAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬