[navi-mumbai] - महापालिकेत वाचन प्रेरणा दिन साजरा

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जयंती दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या संकल्पनेतून वाचन प्रेरणा दिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात समाजविकास विभाग संचलित ग्रंथालयातील वाचनीय पुस्तके अधिकारी, कर्मचारी यांना वाचनासाठी उपलब्ध देण्याचा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला.

वाचनाची आवड जोपासल्यामुळे माणसाच्या ज्ञानात आणि बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची सवय कायम जोपासायला हवी, असे मत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले. महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी महिन्यातून एक दिवस अर्धा तास वाचनासाठी दिला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. वाचन हे माहिती व ज्ञानात भर पडण्याप्रमाणेच कामकाजातील ताणतणाव कमी करण्याचेही काम करते. त्यामुळे वाचन हे सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले....

फोटो - http://v.duta.us/6LaT7AAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/CUCLvwAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬