[pune] - 'एएफएमसी'तीलसंग्रहालयाचे उद्‌‌घाटन

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) येथे उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे; तसेच अत्याधुनिक यंत्रणेचे उद्घाटन लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक व वरिष्ठ कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांच्या हस्ते झाले.

पुरी यांनी मंगळवारी 'एएफएमसी'ला भेट दिली. त्यांच्या हस्ते येथील कॉलेज म्युझियम; तसेच त्वचारोग विभागात अत्याधुनिक 'ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप' सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. या संग्रहालयात कॉलेजचा आतापर्यंत प्रवास, कॉलेजच्या माजी छात्रांची कामगिरी, ७०व्या दशकातील राष्ट्रीय महिला संघाच्या कप्तान व अर्जुन पुरस्कार प्राप्त डॉ. ओतिलिया मस्कारेन्हास यांचे अर्जुन पुरस्कार पदक, लेफ्टनंट जनरल योगेंद्र सिंह यांना दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्ससाठी मिळालेले सुवर्णपदक यांसह अन्य काही सन्मानचिन्हे, भेटवस्तू, स्मृतिचिन्हे मांडण्यात आली आहेत.

'एएफएमसी'ने कायमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याचे सांगून, लेफ्टनंट जनरल पुरी म्हणाले, 'नव्या सुविधेमुळे त्वचारोगासंदर्भातील संशोधनाला चालना मिळेल.' 'एएफएमसीमध्ये ही सुविधा निर्माण होणे भाग्याची गोष्ट असून, त्याचा परिपूर्ण वापर केला जाईल,' असे एएफएमसीचे प्रमुख सर्जन व्हाइस अॅडमिरल रवी कालरा यांनी सांगितले....

फोटो - http://v.duta.us/3kZiZQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/mutRSgEA

📲 Get Pune News on Whatsapp 💬