[pune] - चॅनेलची निवड होणार सोपी

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्रीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नव्या धोरणानुसार ग्राहकांना हवे ते चॅनेल्स निवडता यावेत, घेतलेले चॅनेल्स बंद करता यावेत, ग्राहकांनी घेतलेल्या सबस्क्रिप्शनची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, याकरता आता सर्वच डीटीएच व केबल कंपन्यांना त्यांच्या 'अॅप' आणि 'वेबसाइट' मध्ये बदल करावे लागणार आहेत. कंपन्यांनी ग्राहकांना सोप्या पद्धतीने या प्रक्रिया करता याव्यात, यासाठी 'ट्राय'कडून लवकरच एक नियमावली तयार केली जाणार असून त्यानुसार अॅप आणि वेबसाइटची रचना कंपन्यांना करणे बंधनकारक राहणार आहे. 'ट्राय'च्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात कंपन्यांनीही तयारी दर्शवली आहे.

नवे धोरण लागू झाल्यानंतर 'ट्राय'ने सर्व ग्राहकांना चॅनेल निवडीची मुभा दिली आहे. परंतु, अनेक डीटीएच आणि केबल कंपन्यांच्या वेबसाइट व अॅपवर ही प्रक्रिया क्लिष्ट पद्धतीने राबवण्यात येत होती. अनेक ग्राहकांना त्यांना हवा असलेले चॅनेल घेण्यात किंवा बंद करण्यात अनेक अडचणी येत आहेत. शिवाय कंपन्यांकडून देऊ केलेले बुके (चॅनेलचे पॅकेज) आणि चॅनेल्सचे दर, त्यातील चॅनेल्सची माहिती संबंधित वेबसाइटवर उपलब्ध होत नाही. या संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर 'ट्राय'ने एका सूचनापत्राद्वारे डीटीएच व केबल कंपन्यांच्या अॅप व वेबसाइटसंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याचा निर्णय घेतला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/T7TTagAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬