[pune] - धायरीत वाहनांची तोडफोड

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

दहशत निर्माण करण्यासाठी पूर्ववैमनस्यातून टोळक्याने धायरी येथे हत्यारांनी पार्किंगमधील वाहनांची तोडफोड केली. रविवारी (१३ ऑक्टोबर) पहाटे धायरी येथील टेमरिंगपार्कजवळ ही घटना घडली.

किरण कोळेकर (वय ३२, रा. धायरीगाव) यांनी याबाबत सिंहगडरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळेकर आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. या दोघांमध्ये पूर्ववैमनस्य असल्याने आरोपींनी साथीदारांच्या मदतीने बांबू आणि कोयत्यांनी राजू कोळेकर यांना शिवीगाळ करून धमकावले. त्यानंतर कोळेकर यांच्या घरावर दगडफेक केली. पार्किंगमधील वाहनांची तोडफोड करून साडे अकरा हजार रुपयांचे नुकसान केले. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाहनांची तोडफोड केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. सिंहगड रस्ता परिसरात सातत्याने वाहनांची तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेशाखा निद्रावस्थेत आहे का, असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगार उजळ माथ्याने फिरू लागले आहेत. पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे सांगितले जात असून, परिसरातील तोडफोडीच्या घटना थांबविण्यात स्थानिक पोलिसांनाही अपयश येत आहे. या प्रकरणी सहायक निरीक्षक एच. एम. ननावरे तपास करीत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/kRnFkAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬