[pune] - पाणी साचण्याची समस्या

  |   Punenews

तुकाईनगर

पाणी साचण्याची समस्या

तुकाईदर्शन येथे सत्यपूरम सोसायटीसमोर, श्री शनी मारुती मंदिराजवळ टेकडीवरून येणारे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठते. चौकात पाणी वाहून जाण्याची काहीच व्यवस्था नसल्याने पाणी पुढे पुणे सासवड रस्त्यावरून वाहत राहते. त्यामुळे सतत वाहतूक कोंडी होते. यावर त्वरित उपाययोजना करावी.

कोथरूड

पदपथावर भाजीविक्रेते

कर्वे रोडवर पौड फाटा चौकात पदपथावरच भाजी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. आधीच अतिशय वर्दळीच्या या चौकात पदपथ पूर्णपणे बंद झाल्याने पादचारी रस्त्यावरून चालतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याची दखल घेऊन, या पथारीवाल्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून पदपथ रिकामा करावा.

टिळक रस्ता

झाडांना हवेत पिंजरे

काही महिन्यांपूर्वी टिळक रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर ग्राहक पेठेपर्यंतच्या झाडांना सुरक्षित कुंपण आहे. तिथून स्वारगेटकडे जाताना रस्त्यावरील झाडांना कुंपण नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. ती नष्ट होण्यापूर्वी या झाडांना पिंजरे बसवावेत, तरच ही झाडे वाचतील....

फोटो - http://v.duta.us/tjJgBQAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/2CQgVQAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬