[pune] - बाळासाहेबांचे खरे वारसदार उद्धव ठाकरेच: आठवले

  |   Punenews

पुणे: 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हुशारीने नक्कल करून राज ठाकरे यांनी भाषणात विकास साधला आहे, पण खरे वारसदार उद्धव ठाकरेच आहेत,' असं मत रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी आज पुण्यात व्यक्त केलं.

महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना विरोधकांवरही निशाणा साधला. 'यंदाची निवडणूक आम्हाला २०१४ पेक्षाही सोपी आहे,' असा दावा त्यांनी केला. वंचित व दलितांचं राजकारण करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांवरही त्यांनी नाव न घेता टीका केली. 'वंचित बहुजन आघाडी काढून रिपब्लिकन पक्षाचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, तसं होणार नाही. माझा पक्ष कायम राहणार, असं आठवले म्हणाले.

केंद्रात कॅबिनेट हवे!

विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं भाजपकडं ८ जागांची मागणी केली होती, पण पाच जागा मिळाल्या. त्यामुळं केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवं. राज्यातही एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद हवे. विधान परिषदेत दोन आमदार आणि चार महामंडळांवर प्रतिनिधित्व मिळावं, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं....

फोटो - http://v.duta.us/oCqQrAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/IhrU_QAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬