[pune] - राज्यातून मान्सून माघारी

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात जून अखेरपासून मनसोक्त बरसलेल्या मान्सूनने मंगळवारी निरोप घेतला. दक्षिणेकडील काही जिल्ह्यांचा भाग वगळता पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून बाहेर पडला. यंदा पावसाने २५ ते १५ ऑक्टोबर असा ११३ दिवस मुक्काम केला आणि गेल्या बारा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा राज्यात झाली. मान्सून परतला असला, तरी पुढील दोन दिवस वातावरणातील स्थानिक घटकांमुळे पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गेल्या वर्षी दुष्काळ अनुभवल्यामुळे यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील नागरिकांनी मान्सूनच्या आमगनाची वाट बघितली होती. जूनच्या पहिल्या तीन आठवड्यात आलेल्या अडथळ्यांमुळे पाऊस झाला नाही. त्यामुळे यंदा पावसाळ्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढविण्यात आले. पण हवामान विभागाचा अंदाज अचूक ठरवत जूनच्या आठवड्यात मान्सून सक्रिय झाला आणि जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भरभरून बरसला. अतिवृष्टी, वादळी वाऱ्यांसह पडलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्राला पुराचा फटका बसला. राज्याने गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक सक्रीय मान्सून यंदा अनुभवला. दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरील मान्सून राज्यातून बाहेर पडतो. यंदा हा देखील विक्रम मोडून मान्सून १५ ऑक्टोबरला राज्यातून बाहेर पडला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये संपूर्ण देशातून मान्सून बाहेर पडेल आणि दक्षिणेकडील राज्यांत ईशान्य मान्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/uNPUWgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬