[pune] - वृक्षतोड हा योगायोग!

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'सर परशुराम भाऊ कॉलेजमध्ये तोडलेली झाडे धोकादायक असल्याचा अर्ज आम्हाला आला होता, त्याची शहानिशा करूनच वृक्षतोडीला परवानगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि वृक्षतोड हा निव्वळ योगायोग आहे,' असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आणि आता पंतप्रधान मोदी यांची सभा, असे एकापाठोपाठ एक आलेले हे 'योगायोग' झाडांच्या मुळावर उठले, अशी चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी रस्त्याच्या कडेच्या झाडांची विनाकारण कत्तल केल्याची घटना ताजी असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एस. पी. कॉलेजमधील मैदानावरील वीस मोठी झाडे प्रशासनाने तोडल्याची घटना पुढे आली आहे. वृक्षतोडीबद्दल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. एस. पी. कॉलेजच्या मैदानावर येत्या गुरुवारी (१७ सप्टेंबर) सभा होणार आहे. सभेसाठी मैदानावर सध्या वॉटरप्रूफ मांडव घालण्याचे काम सुरू असताना सोमवारी संध्याकाळनंतर वीस मोठी झाडे तोडण्यात आली. झाडाच्या धोकादायक फांद्या छाटण्याऐ‌वजी ते खोडापासून कापल्यामुळे या संदर्भातील फोटो मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. झाडांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना, वृक्षप्रेमींनाही मैदानावर जाण्यास परवानगी मिळाली नाही. याप्रकरणी महापालिका आणि एस. पी. कॉलेज प्रशासनाने तोडलेली ही झाडे धोकादायक नसून केवळ सभेसाठी तोडल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/jYxjngAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬