[ratnagiri] - राणे जिथे गेले त्या पक्षाची विल्हेवाट लागली: उद्धव

  |   Ratnagirinews

कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कणकवलीतील जाहीर सभेतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. 'नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची वाट लागते. त्यांनी काँग्रेसची विल्हेवाट लावली आणि आता ते भाजपात गेले आहेत. राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल माझ्याकडून भाजपला शुभेच्छा', असा टोलाच उद्धव यांनी या सभेत लगावला. 'मित्राच्या घरात चोर घुसत असताना शांत बसणे शक्य नाही. मी येथे टीका करण्यासाठी आलो नाही तर भाजपला सावध करण्यासाठी आलो आहे', असेही उद्धव म्हणाले.

कणकवली मतदारसंघात भाजप आणि शिवसेना हे युतीतील दोन्ही मित्रपक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. भाजपने नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांना तर शिवसेनेने राणेंची साथ सोडून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. मंगळवारी नितेश यांच्या प्रचारासाठी व नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवलीत सभा झाल्यानंतर आज लगेचच उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत सभा घेऊन राणे पितापुत्रांच्या भाजप प्रवेशाचा समाचार घेतला. 'संपूर्ण कोकण आम्हाला भगवा करायचा आहे. येथे कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर ती तोडून मोडून टाकण्याची धमक आमच्यात आहे', असा इशाराच यावेळी उद्धव यांनी दिला....

फोटो - http://v.duta.us/ABEVnwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/Hirn8wAA

📲 Get Ratnagiri News on Whatsapp 💬