[thane] - कारागृहात कैद्यांची भर

  |   Thanenews

निवडणुकीतील गुन्हेगारांवरील पोलिसांच्या कारवाईने प्रशासन चिंतेत

ठाणे मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा कैद्यांची संख्या चौपट

लक्ष ठेवताना उडते तारांबळ

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ठाणे मध्यवर्ती कारागृहाने कैदी ठेवण्याची क्षमता केव्हाच ओलांडली असून सद्यस्थितीत क्षमतेपेक्षा अधिक कैदी कारागृहात आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीमुळे कारागृह प्रशासनाची चिंता वाढली आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईचा सपाटा लावला. गुन्हेगारांची रवानगी कारागृहात करण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे कारागृहावर नव्याने सुमारे २०० ते ४००च्या आसपास गुन्हेगारांची भर पडल्याचे कारागृहातील सूत्रांनी सांगितले. गुन्हेगाराला कारागृहात आणल्यानंतर कारागृहात प्रवेश देणे आमचे काम आहे, असे कारागृहातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हाऊसफुल्ल झालेल्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात सोमवारी एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर कारागृहातील कैद्यांच्या संख्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. गंभीर गुन्हा दाखल असलेल्या एका कैद्याला बरॅकमध्ये झोपायला जागा नाही. त्यामुळे रात्रभर त्याला एका कुशीवर झोपावे लागत असून याबाबतची खंत त्याने कारागृहातील अधिकऱ्यांपुढे बोलून दाखवली होती. दुसरी व्यवस्था करण्याची मागणी केली. त्याच दरम्यान त्याने कारागृहातील बरॅक क्रमांक सहाच्या छतावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ठाणे कारागृहाची क्षमता केवळ एक हजार १०० इतकीच आहे. मात्र सध्या ४ हजार १०० कैदी असल्याचे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने या सर्व कैद्यांवर लक्ष ठेवताना कारागृह प्रशासनाची तारांबळ उडत आहे. जवळपास कारागृहात चौपट कैदी अधिक असल्याचे चित्र असून दिवसेंदिवस कैद्यांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने कारागृह प्रशासनावर कामाचा अधिक भार पडू लागला आहे. नियमानुसार सहा कैद्यांमागे एक पोलिस शिपाई असायला पाहिजे, मात्र ठाणे कारागृहात उलट चित्र आहे. कैद्यांची संख्या जास्त आणि कर्मचारी कमी आहेत. तरीही कमी मनुष्यबळामध्ये कारागृहातील अधिकारी, कर्मचारी कैद्यांवर लक्ष ठेवून असतात. कैद्यांच्या जास्त संख्येने वेगवेगळ्या समस्याही निर्माण होत असून विधानसभा निवडणुकीमुळे कैद्यांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/TaSDMwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬