[thane] - ठाण्यात प्रचाराची रणधुमाळी!

  |   Thanenews

मॉर्निंग वॉक, बाइक रॅली, गृहभेटी, कॉर्नर सभा, बैठकांचा रतीब

टीम मटा, ठाणे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने ठाण्यात प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार, नेते, कार्यकर्ते प्रचारामध्ये सक्रिय झाले असून प्रचारामध्ये अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये मताधिक्य मिळालेल्या ठिकाणच्या मतदारांना भेटून नव्या भागांत अधिक लक्ष देण्यासाठी मॉर्निंग वॉक, बाइक रॅली, गृहभेटी, कॉर्नर सभा, बैठकांचा जोर लावला आहे.

ठाणे जिल्हा शिवसेना आणि भाजप यांचा बालेकिल्ला असल्यामुळे या पक्षांकडून आक्रमक प्रचारावर भर दिला जात आहे. कोपरी-पाचपाखाडीतून पालकमंत्री एकनाथ शिंदे, ओवळा माजीवड्यातून प्रताप सरनाईक आणि मुंब्रा-कळव्यात दीपाली सय्यद यांच्या प्रचाराला वेग आला आहे. चाळी, झोपड्यांपासून ते लहानमोठ्या सोसायट्यांमध्ये आणि बड्या गृहसंकुलांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला जात आहे. काही ठिकाणी रोड शो तर काही ठिकाणी प्रभातफेऱ्यांचे आयोजन केले जात आहे. एकनाथ शिंदे यांना स्वत:चा मतदारसंघ सांभाळण्याबरोबरच जिल्ह्यातील अन्य भागांमधील प्रचारासाठीही हजेरी लावावी लागत आहे. त्यामुळे कोपरी-पाचपाखाडीतील प्रचाराची धुरा शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी अंगावर घेतली आहे. ठाण्यात युतीकडून भाजपचे संजय केळकर रिंगणात असून प्रचार रॅली, वैयक्तिक भेटी घेण्यावर अधिक भर दिला आहे. मॉर्निंग वॉकला निघालेल्या मतदारांच्या आणि दुपारी डॉक्टर, वकील तसेच अन्य क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींच्या भेटी घेऊन प्रचार करण्यात येत आहे. दररोज सायंकाळी एका प्रभागात फिरून प्रचार केला जात असून रात्री दहाला प्रचार संपल्यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रचाराचा आढावा घेतला जात आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/AvesLwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬