[thane] - पाऊस लांबल्याने आदिवासींची दिवाळी अडचणीत

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, पालघर

यंदा परतीचा पाऊस अद्याप सुरूच आहे. त्यामुळे आदिवासी बंधवांसमोर दिवाळी कशी साजरी करायची? असा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. दरवर्षीप्रमाणे दसऱ्यानंतर १०-१२ दिवस सावकाराकडे किंवा शहरात जाऊन मजुरी करून मिळालेल्या पैशांतून हे आदिवासी दिवाळी साजरी करतात. मात्र पाऊसच लांबल्याने यंदाची दिवाळी आदिवासींच्या दृष्टीने अतिशय अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

दसऱ्यानंतर जव्हार, मोखाडा तालुक्यातील आदिवासी रोजगार नसल्याने नेहमीच भात कापणीसाठी वाडा, भिवंडी, पालघर, ठाणे, वसई या भागांत जातात. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांचा तो रोजगारही बंद झाला आहे.

जव्हार तालुक्यात रोजगार नाही, त्यामुळे दसरा झाल्यानंतर या भागातील मजूर मोठ्या संख्येने रोजगारासाठी स्थलांतरित होतात. यावर्षी पाऊस अद्याप पडत असल्यामुळे रोजगार हमीची कामेही बंद आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/d73bCwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬