[thane] - 'राजकारण्यांनी नागरिकांना मूर्ख बनवले'

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा, वसई

निविदा माफिया आणि कंत्राटदारांमार्फत होणारे घोटाळे, याकडे विशेष लक्ष देणार असून त्यांच्यामार्फत चालणारी दलाली संपुष्टात आणण्याचे काम सर्वप्रथम करणार आहे. तरच सर्वसामान्य नागरिका सुखी होतील. या शहरांमध्ये आतापर्यंत सत्तेतील राजकारण्यांनी नागरिकांना मूर्ख बनवण्याचे काम केले. नागरिकांऐवजी स्वहित साधल्यामुळे मतदार या राजकारण्यांना या निवडणुकीमध्ये आपला रस्ता नक्कीच दाखवतील, अशी टीका मिरा-भाईंदर १४५ मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी आपला वचननामा प्रकाशन सोहळ्यावेळी व्यक्त केले.

मिरा-भाईंदरमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले असून प्रत्येक उमेदवाराने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. भाजपमधून माजी महापौर राहिलेल्या गीता जैन स्थानिक आमदारांविरोधात बंड पुकारत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यामुळे मिरा-भाईंदर १४५ मतदारसंघातील निवडणूक रंगतदार बनली आहे. त्यातच त्यांनी मंगळवारी आपला वचननामा जाहीर केला. यावेळी अनेक घोषणाही केल्या. शहरातील प्रत्येक नागरिकासाठी एक चांगले रुग्णालय, शाळा, तरुणींसाठी स्पोर्ट्स क्लब, रस्ते बनविण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरातील फेरीवाल्यांची समस्या संपुष्टात आणून या शहराला गरजेच्या ठिकाणी भाजीमंडई उभारून देणार असल्याचे त्यांनी आपल्या वाचननाम्यामध्ये जाहीर केले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/_gsh6gAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬