[thane] - स्लॅब कोसळून मुलगी अडकली

  |   Thanenews

वसई : विरार पूर्वेकडील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यामध्ये एक पाच वर्षांची मुलगी अडकली असून तिला बाहेर काढण्याचे प्रयत्न अग्निशमन दलातर्फे रात्री उशिरापर्यंत करण्यात येत होते.

विरार पूर्वेकडे कोपरी नित्यानंद नगरमधील एका इमारतीचा चौथ्या मजल्यावरील काही भाग कोसळल्यानची घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली असता त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत बचावकार्यास सुरवात केली. यामध्ये सुमारे ३० ते ३५ कुटुंबे राहत असल्याने त्यांना येथून बाहेर काढण्यात आले. या इमारतीमध्ये राहणारी एक पाच वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. शोधकार्य सुरू असताना तिच्या अंगावर स्लॅबचा काही भाग कोसळल्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत अग्निशमन जवानांना दिसून आल्याचे अग्निशमन जवानांनी सांगितले. यामधून तिला बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही इमारत सुमारे २० वर्षे जुनी असून निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरल्याने इमारतीचा भाग कोसळल्याचा संशय येथील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

फोटो - http://v.duta.us/yviF0gAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/ezMMLAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬