उल्हासनगरात भाजपच्या महापौरांकडून राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींचा प्रचार

  |   Maharashtranews

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या भाजपच्या महापौर पंचम कलानी यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे .पक्षाविरोधी विरोधी काम केल्या मुळे त्यांना हि नोटीस पाठवण्यात आली आहे .मात्र नोटिस मिळाली तर ती फाडून तोंडावर मारेल असे उत्तर पंचम कलानी यांनी दिले आहे.

उल्हासनगर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती कलानी या भाजपच्या महापौर पंचम कलानी यांच्या सासु आहेत. पंचम यांनी सासुबाईच्या प्रचारात उघड उडी घेतल्याने भाजपने महापौर पंचम कलानी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भाजपचे पालिकेतील गटनेते जमनु पुरस्वानी यांनी ही नोटीस पंचम कलानी यांना पाठवली आहे. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी आणि महापौर पंचम कलानी यांच्यात उमेदवारीची चढाओढ होती.

पंचम कलानी यांना उमेदवारी मिळणार असे सांगण्यात आल्याने सुनेच्या प्रचाराच्या वेळी अडचण नको म्हणून ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र भाजपाचे पंचम कलानी यांना अखेरपर्यंत उमेदवारीसाठी झुलवत ठेवले आणि अखेर कुमार आयलानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे रातोरात ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीकडून एबी फॉम मिळवला होता....

फोटो - http://v.duta.us/tnbuZAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/zh9haAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬