उल्हासनगरमध्ये लहान मुलांकडून निवडणुकीचा प्रचार

  |   Maharashtranews

उल्हासनगर : लहान मुलांच्या जिवाशी खेळून त्यांच्याकडून प्रचार करून घेतला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. येथे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये लढत होते आहे. या दोन्ही पक्षांकडून प्रचारात लहान मुलांचा सर्रास वापर होताना दिसतो आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे भाजपच प्रचार करणारी मुलं चक्क रेल्वे रुळावरून फिरताना दिसली.

रेल्वे रुळांना लागून असलेल्या झोपडपट्टीत प्रचार करण्यासाठी ही मुलं रुळावरून फिरत होती. रूळ ओलांडताना जर दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी उमेदवारांनी घेतली असती का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

सध्या राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्ष जोरदारपणे प्रचाराला लागले आहेत. निवडणुकीपर्यंत मतदारांना कशा प्रकारे आपल्याकडे आकर्षित केलं जाईल. यासाठी उमेदवार वेगवेगळ्या प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.

फोटो - http://v.duta.us/NHBnFwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/9uSeXgAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬