कृषी क्षेत्रापासून आर्थिक मंदीची सुरुवात

  |   Sataranews

कराड ः प्रतिनिधी

देशात आर्थिक मंदीची सुरुवात कृषी व ग्रामीण भागात दोन वर्षापूर्वी झाली. ती हळूहळू विविध क्षेत्रात पसरले असून आज संपूर्ण देश मंदीचा सामना करत आहे. कृषिक्षेत्रात सुरू झालेली मंदी नंतर बांधकाम क्षेत्रात आली व त्यानंतर आता मोठमोठे उद्योग व ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी आल्याने त्याचा रोजगारावर परिणाम झाला आहे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केले.

कराड येथे फ्रेंड्स ऑफ डेमोक्रॉसी यांच्या वतीने आयोजित 'भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती' या विषयावर ते बोलत होते. यावेळी कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, विजय दिवाण, रमाकांत खेतन आदी प्रमुख उपस्थित होते.

यशवंत सिन्हा म्हणाले, सध्या महाराष्ट्रात निवडणुका सुरू असून माझा या निवडणूकांशी काहीही संबंध नाही. तत्त्वाच्या आधारावर जे वास्तव आहे त्यावर भाष्य करणार आहे. सध्या देशावर आलेल्या मंदीच्या संकटाबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु, सुमारे पंचवीस महिन्यांपूर्वी कृषी क्षेत्रात प्रथम मंदीची सुरुवात झाली. त्यावेळीच भविष्यात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याबाबत मी लेख लिहिला होता. त्या लेखामधून बोध घेतला जाईल असे वाटले होते. परंतु तसे न होता उलट माझ्यावरच आरोप करण्यात आले. अर्थव्यवस्थेचे नियम निष्ठूर आहेत. ते कोणाचेही ऐकत नाहीत. त्यामुळे भविष्यात होणार्‍या परिणामांचा विचार करून पावले टाकावी लागतात....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/The-beginning-of-the-economic-slowdown-from-the-agricultural-sector/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/The-beginning-of-the-economic-slowdown-from-the-agricultural-sector/

📲 Get Satara News on Whatsapp 💬