गोमंतकीय चित्रपटांसाठी विशेष विभाग

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

राज्यात नोव्हेंबर महिन्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) गोमंतकीय चित्रपटांसाठी विशेष विभाग असावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरावरून केली जात होती. याची दखल घेऊन अखेर आयोजकांकडून गोमंतकीय मराठी व कोकणी फिचर व नॉन फीचर चित्रपटांसाठी इफ्फीत विशेष स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इफ्फीसाठी चित्रपट पाठविण्यासाठीचा अर्ज गोवा मनोरंजन संस्था (इएसजी) तसेच इफ्फीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर आहे.

गोमंतकीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सदर विशेष विभाग ठेवण्यात आला आहे. चित्रपट पाठवायला अर्ज भरण्यासाठी काही अटी व नियम लागू करण्यात आले आहेत. फिचर विभागातील चित्रपट मराठी किंवा कोंकणी अशा दोनच भाषेत तर नॉन फिचर विभागात चित्रपट मराठी, कोंकणी, इंग्रजी व हिंदी भाषेत असणे आवश्यक आहे. तसेच चित्रपटाचे निर्माते गोमंतकीय असणे बंधनकारक आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Special-section-for-goa-movies-in-film-festival/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Goa/Special-section-for-goa-movies-in-film-festival/

📲 Get goanews on Whatsapp 💬