जिल्हा बँक भरती आरक्षण याचिका फेटाळली

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्हा बँकेच्या कर्मचारी भरती प्रक्रियेविरोधात कास्ट्राईब कर्मचारी संघटनेची याचिका बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. जिल्हा बँकेत शासन भागभांडवल नसल्याने शासनाचा आरक्षणविषयक अधिनियम लागू होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली जिल्हा बँकेकडील लिपिक पदाच्या 400 जागांवरील भरती प्रक्रिया 'खुली' झाली आहे, अशी माहिती अ‍ॅड. उमेश माणकापुरे यांनी दिली.

सांगली जिल्हा बँकेकडील लिपिक पदाच्या 400 जागांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. या सर्व 400 जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जात आहेत. भरतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, एसईबीसी, आदींसह शासनाने निर्धारित केलेल्या सर्व आरक्षित घटकांना भरतीत आरक्षण मिळावे, अशा मागणीची जनहित याचिका कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदरजोग व न्या. भारती डोंगरे यांच्यासमोर बुधवारी सुनावणी झाली. न्यायालयाने ही जनहित याचिका फेटाळली आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/District-Bank-Recruitment-Reservation-Petition-rejected/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/District-Bank-Recruitment-Reservation-Petition-rejected/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬