टोंका प्रकल्पात २८ टँकर रोखले

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

ओला कचरा घेऊन गेलेल्या पणजी-ताळगावच्या तीन ट्रकांना साळगाव कचरा प्रकल्पात गेले तीन दिवस प्रवेश देण्यात आला नाही. ओल्या कचर्‍याची वाहतूक करणार्‍या ट्रकांसाठी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनही अडवणूक केली जात असल्याने पणजी महानगरपालिकेने टोंका-पणजी येथील मलनिस्सारण प्रकल्पात उत्तर गोव्यातून आलेल्या 28 'नाईट सॉईल टँकर'ना बुधवारी प्रवेश दिला नाही.

यामुळे, आता साळगाव कचरा प्रकल्पाच्या व्यवस्थापनाकडून पणजी-ताळगावच्या ट्रकांना प्रवेश देण्याचे लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय नाईट सॉईल टँकर्सना प्रवेश देणार नाही, असा इशारा पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी बुधवारी दिला.

महानगरपालिकेत महापौरांच्या कक्षात खास बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मडकईकर बोलत होते. ते म्हणाले की, उत्तर गोव्यातून टोंका-पणजी येथील मलनिस्सारण प्रकल्पात दररोज सुमारे 100 नाईट सॉईल टँकर्सना प्रवेश दिला जातो. पर्यटन हंगामाच्या काळात हीच संख्या 120 टँकर्सवर पोहचते. या टँकर्सच्या वर्दळीचा स्थानिकांना त्रास होत असून वाहतूक कोंडी होणे, पदपथ मोडणे, लाद्या फुटणे आदी प्रकारही या टँकरमुळे पणजीकरांना सहन करावे लागत आहेत. साळगाव प्रकल्पात अडवणूक होत असल्याने आमची सहनशक्ती संपली, त्यामुळेच बुधवारी टोंका प्रकल्पात उत्तर गोव्यातून दुपारी आलेले 22 आणि संध्याकाळपर्यंत आलेले 6 असे मिळून 28 टँकर्स परत पाठवण्यात आले. आम्ही टँकर स्वीकारणे बंद केल्याचे कळल्याने आणखी टँकर दाखल झाले नाहीत....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/28-tankers-were-stopped-in-the-Tonka-project-in-goa/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Goa/28-tankers-were-stopped-in-the-Tonka-project-in-goa/

📲 Get goanews on Whatsapp 💬