धूळ...खड्डे अन् खडी उखडल्याने सर्वसामान्य त्रस्त

  |   Sataranews

कराड : प्रतिनिधी

नियोजनशून्य कारभार... दोन विभागात समन्वयाची कमी अन् त्यामुळे होणारी रस्त्यांची दुर्दशा कराडकरांसाठी काही नवी नाही. सद्यःस्थितीत भेदा चौक ते कार्वे नाका आणि वाखाण परिसरात रस्त्यावर तर पदोपदी यांचा अनुभव नागरिक घेत आहेत. रस्त्याचे काम झाल्यावर अनेकदा पाईपलाईन जोडण्यासाठी रस्त्याची खुदाई केली जात आहे. वास्तविक गेल्या 10 वर्षांपासून पाणी योजनेचे काम सुरू आहे. मात्र असे असूनही पाईपलाईन जोडण्यासाठी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावरच खुदाई केली जात असल्याने रस्त्यासाठी खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात जात आहेत. त्यामुळेच नगरपालिका प्रशासन यातून बोध घेत नागरिकांना दिलासा केव्हा देणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

ऑलिम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव स्मृतीस्तंभाचे विद्रुपीकरण

कराड नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून भेदा चौकातून गोळेश्‍वरकडे जाणार्‍या मार्गावर देशाला वैयक्‍तिक क्रीडा प्रकारात पहिले पदक मिळणार्‍या स्व. पै. खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ ऑलिम्पिक स्पर्धेचे बोधचिन्ह तयार केले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली आहे. याशिवाय धुळीमुळे या ठिकाणी विद्रुपीकरण वाढले असून स्तंभासाठी वापरलेल्या फरशाही निघाल्या आहेत. झाडी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या ठिकाणी नेमके काय उभारले आहे? हेच समजत नाही. केवळ ऑलिम्पिकच्या बोधचिन्हावर स्व. खाशाबा जाधव यांचे नाव असल्याने या स्तंभाबाबत समजून येते. मात्र सद्यःस्थितीत या स्तंभाकडे पाहिल्यावर नगरपालिकेचा निष्काळजीपणाच समोर येतो आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Generally-suffering-from-dust-pits-and-rocks/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/Generally-suffering-from-dust-pits-and-rocks/

📲 Get Satara News on Whatsapp 💬