पीएम मोदींच्या सभेचे मैदान 'ओव्हरफ्लो', प्रवेश बंद केल्याने सातारकर संतप्त

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी साताऱ्यात रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. त्‍यामुळे लोकांना सभास्‍थळी आतमध्ये जाण्यास प्रवेश नाकारण्यात येत आहे. सभेला उपस्‍थिती लावण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्‍या लोकांना प्रवेश नाकारल्‍याने लोक संतप्त झाले. या ठिकाणी उद्भवलेल्‍या गोंधळामुळे बंदोबस्‍तासाठी असलेल्‍या पोलिसांसमोर बिकट प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या विधानसभेसाठी महाराष्‍टात सभा आयोजित करण्यात आल्‍या आहेत. यामध्ये सकाळी पंकजा मुंडे यांच्यासाठी परळीची सभा संपवून पंतप्रधान मोदी आता साताऱ्यात सभेला संबोधीत करणार आहेत.

सकाळी ११ वाजल्या पासून सैनिक स्कूलमध्ये नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. दुपारी अडीच वाजेपर्यंत मैदान पूर्ण क्षमतेने भरले. यामुळे प्रवेश बंद करण्यात आला. सभास्‍थळी प्रवेश बंद करण्यात आल्‍याने लोक संतप्त झाले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/people-angry-in-satara-due-to-pm-modi-rally-ground-gate-closed-for-crowd-overflow/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Satara/people-angry-in-satara-due-to-pm-modi-rally-ground-gate-closed-for-crowd-overflow/

📲 Get Satara News on Whatsapp 💬