भाजपला मत देणार्‍याला कृष्णेत ढकलून द्या : आ. जयंत पाटील

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

महापुराने सांगलीवाडीत मोठे नुकसान झाले. पूरग्रस्तांनी वारंवार मागणी करुनही प्रशासन व भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून मदत मिळाली नाही. लोक टाहो फोडत असताना भाजपचे आमदार एसी कार्यालयात बसून होते. मदतीची केवळ शोबाजी करीत होते. आता याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. सांगलीवाडीतून भाजपला मत देण्यार्‍या गद्दाराला कृष्णा नदीत ढकलून द्या, अशी घणाघाती टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.

सांगलीतील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडी येथे सभा झाली. यावेळी ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, महापुराच्या काळात जे तुमच्या मदतीला आले नाहीत ते भविष्यात तुमचे प्रश्न सोडविणार कसे ? स्थानिक लोकांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले, पण सरकारने पूरग्रस्तांना मदत केल्याचा डांगोरा पेटवला गेला. महापूर ओसरुन आता दोन महिने होत आले. मात्र शेतकरी, व्यापारी व घरांची पडझड झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. निवडणुकीत नुसता घोषणांचा पाऊस पाडला जात आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Put-the-BJP-voter-in-Krishna-river-says-MLA-jayant-patil-in-sangli/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/Put-the-BJP-voter-in-Krishna-river-says-MLA-jayant-patil-in-sangli/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬