मिरजेत पत्नीचा भोसकून खून

  |   Sanglinews

मिरज : प्रतिनिधी

येथील रेल्वेस्थानक परिसरात चारित्र्याच्या संशयावरून सोनम राहुल माने (वय 19) हिचा पतीने चाकूने भोसकून खून केला. खुनानंतर पती राहुल अशोक माने (21) हा पसार झाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके कर्नाटकात रवाना झाली आहेत.

बुधवारी मध्यरात्री रेल्वे स्थानकाजवळील रॉकेल डेपो झोपडपट्टीत ही घटना घडली. याप्रकरणी संशयिताची सावत्र आई मंगल बाबू आच्चुदन यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः राहुल व सोनम माने यांचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. राहुल हा वीटभट्टीवर काम करतो. तो व्यसनाच्या आहारी गेला आहे. विवाह झाल्यापासून तो सोनमच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून दोघांमध्ये नेहमी भांडण होत असे. त्या वादातून तो सोनमला मारहाण करीत असे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/wife-murdered-by-husband-in-miraj/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://www.pudhari.news/news/Sangli/wife-murdered-by-husband-in-miraj/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬