राज्य सहकारी बैंक गैरव्यहार प्रकरणी अजित पवार बरसले

  |   Maharashtranews

हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : म्हशीला रेडवू झालं आणि जन्मताच ते म्हशी पेक्षा मोठं झालं अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सहकारी बैंक गैरव्यहार प्रकरणी भाष्य केले आहे. शिरुर हवेली विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारात ते बोलत होते.

आम्ही कधी सत्तेचा माज आणि मस्ती केली नाही. राज्य सहकारी बँकेत साडेअकरा हजार कोटींच्या ठेवी असताना पंचवीस हजार कोटींचा घोटाळा होईलच कसा ? हे म्हणजे असं झालं म्हशीला रेडवू झालं आणि जन्मताच ते म्हशी पेक्षा मोठं झालं अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केलं.

विधानसभेत जर आघाडीचे सरकार आले तर तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी शिरुरकरांना दिले. त्यांनी शिवसेना-भाजपाने दिलेल्या आश्वासनांवर यावेळी त्यांनी टिका केली. सेनेने शेतकऱ्यांना एकीकडे कर्जमुक्ती केली तर भाजपाने कर्जमाफी दिल्याचा बागुलबुवा केला....

फोटो - http://v.duta.us/I-1RegAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/2Mjg4gAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬