'लक्ष्मी घड्याळाचे काटे बघून युवराजासोबत येत नाही तर कमळातून येईल'

  |   Maharashtranews

मयुर निकम , झी मीडिया, बुलढाणा : दिवाळीत येणारी लक्ष्मी ही घड्याळाचे काटे अथवा युवराजासोबत नव्हे तर कमळात बसून येईल असा टोला भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारात त्या बोलत होत्या. भाजपच्या 40 स्टार प्रचारकांपैकी त्या एक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर आता त्यांचे दौरे सुरू झाले आहेत. विदर्भातील मलकापूर विधानसभा मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्यांनी आपल्या शैलीतून कोपरखळ्या मारल्या.

दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन होतं आणि लक्ष्मी ही कुण्या युवराजाचा हात पकडून कधीच येत नाही. लक्ष्मी ही बंद पडलेल्या घड्याळाचे काटे पाहून कधीच येत नाही. तर लक्ष्मी ही कमळावर बसून येते अशी खोचक आणि अप्रत्यक्ष टीका त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर केली....

फोटो - http://v.duta.us/zhB1RwAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/O4nP0AAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬