[ahmednagar] - आम्ही एकच व पक्षनिष्ठ

  |   Ahmednagarnews

राठोड, गांधींचा जुळला सूर; फटाके वाजवून व पेढे वाटून मनोमिलनाचा जल्लोष

म. टा. प्रतिनिधी, नगर

'आम्ही दोघे एकच आहोत व आपापल्या पक्षांशी मागील ३५ वर्षांपासून एकनिष्ठ आहोत. आमच्यात आपसांत काहीही वाद नाहीत व जे झाले ते कार्यकर्त्यांवरील अन्यायाच्या विषयामुळे झाले आणि आताही कार्यकर्त्यांमुळेच आमचे मनोमीलन झाले,' अशी भावना शिवसेनेचे नगर विधानसभेचे उमेदवार अनिल राठोड व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष-माजी खासदार दिलीप गांधी यांनी बुधवारी व्यक्त केली. शहराच्या राजकारणात परस्परांचे विरोधक मानले जाणारे गांधी व राठोड यांचा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जुळलेला सूर पाहून दोन्हीकडच्या समर्थकांनी फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष केला.

विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा आला असतानाही शहर भाजपमधील गांधी गट शिवसेनेच्या प्रचारात सहभागी झाला नव्हता. त्यामुळे गांधी व राठोडांतील वादाची चर्चा जोरात होती. गांधींनी राठोडांच्या प्रचारात सहभागी होण्याविषयी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्न केले होते. पण त्याला यश आले नव्हते. त्यानंतर पूर्वी शिवसेनेत असलेल्यांनी दोघांत समेटाचे प्रयत्न केले होते. त्यांना अखेर यश आले. गांधी मैदानातील कार्यालयात शहर भाजपची बुधवारी सकाळी १० वाजता बैठक होती आणि बैठकीत राठोड यांनी येण्याचे ठरले होते. पण त्यांना येण्यास सुमारे तास-दीड तास उशीर झाल्याने या प्रस्तावित मनोमिलनाबाबत संभ्रम चर्चेत होता. अखेर राठोड बैठकीच्या स्थानी पोहोचले. गांधी व राठोडांनी एकमेकांची गळाभेट घेतली. गांधींनी राठोडांना पुष्पगुच्छ दिला. मनोमिलनावर दोघांची भाषणेही दणक्यात झाली आणि गांधी मैदानाच्या परिसरात फटाके वाजविण्यात आले. या दणदणाटात एकमेकांना पेढे खाऊ घालून दोघेही नागरिकांना हात जोडत चितळे रस्ता परिसरात फिरले. या वेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश कवडे, श्याम नळकांडे, संजय शेंडगे, युवा सेना प्रमुख विक्रम राठोड तसेच शहर भाजपचे सरचिटणीस किशोर बोरा, माजी नगरसेवक किशोर डागवाले व सुवेंद्र गांधी, अॅड. सुनील सूर्यवंशी, बंटी डापसे, प्रशांत मुथा व अन्य उपस्थित होते....

फोटो - http://v.duta.us/N0GUpgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/eLfrNwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬