[ahmednagar] - ४१६ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे नजर

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तब्बल ४१६ मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी प्रशासनाची 'वेबकास्टिंग'च्या माध्यमातून नजर राहणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या मतदान केंद्रावरील सर्व प्रक्रिया पाहता येणार आहे.

जिल्ह्यामध्ये बारा विधानसभा मतदारसंघ असून २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या दहा टक्‍के केंद्रांचे वेबकास्टिंग करण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण ३ हजार ७२२ मतदान केंद्रे असल्यामुळे वेबकास्टिंग करण्यासाठी सुरुवातीला ३७८ केंद्रे निश्चित करण्यात आली होती. मात्र, वेबकास्टिंग करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या मतदान केंद्रांपैकी दिव्यांग व्यक्तींद्वारे चालवली जाणारी मतदान केंद्रे, महिला अधिकारी-कर्मचारी यांच्याद्वारे चालवली जाणारी मतदान केंद्रे, आदर्श मतदान केंद्रे, संवेदनशील मतदान केंद्रे यांचाही समावेश करण्यात यावा, असे निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक शाखेला कळवले आहे. त्यामुळे आता वेबकास्टिंग करण्यासाठी निश्चित केलेल्या मतदान केंद्रांची संख्या ३८ ने वाढली असून आता जिल्ह्यातील बारा मतदारसंघांतील एकूण ४१६ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाणार आहे. वेबकास्टिंगसाठी निवडण्यात आलेल्या मतदान केंद्रांमध्ये मतदारांच्या मतदान गोपनियतेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने कॅमेरा लावण्यात येणार आहे. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने केंद्रावर मतदान सुरू होण्यापासून संपेपर्यंतच्या सर्व घडामोडींचे चित्रण होणार आहे. हे चित्रण थेट सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक आयोगातील प्रमुख अधिकाऱ्यांनासुद्धा पाहणे शक्य होणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/DloaVQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬