[aurangabad-maharashtra] - कुणाचा पाढा, कुणाचे आर्जव, तर कुणी साधला निशाणा...

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुणी विकासाचा पाढा वाचला, कुणी मतदानाचे आर्जव केले, तर कुणी एकाच दगडात दोन पक्षी मारण्यासाठी निशाणा साधण्याचा प्रयत्न केला..., असे चित्र ब्राह्मण समाज समन्वय समितीने बुधवारी (१६ ऑक्टोबर) कलश मंगल कार्यालयात आयोजित सभेत पहायाला मिळाले. औरंगाबाद मध्यचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल, पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाठ, तर पूर्वचे उमेदवार अतुल सावे यांनी शंभर टक्के मतदानाचे आवाहन केले.

मुख्यमंत्र्यांनी कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी ९० कोटी, पाणी योजनेसाठी १६८० कोटी मंजूर केले, याचा पुनरुच्चार करत शहरात दोन मोठे उद्योग येणार असून, सुमारे चार ते पाच हजार तरुणांना रोजगार मिळणार असल्याचे अतुल सावे म्हणाले. 'आयटी पार्क'मध्येही नवे उद्योग येतील व अडीच ते तीन हजार तरुणांना रोजगार मिळेल आणि त्यामुळे शहरातील तरुणांना नोकरीसाठी बाहेर जाण्याची गरज उरणार नाही. वीर सावरकर संशोधन केंद्रासाठीही दहा कोटी रुपये मंजूर केले जातील, असेही आश्वासन सावेंनी दिले....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/G1kGfwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬