[aurangabad-maharashtra] - कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला

  |   Aurangabad-Maharashtranews

औरंगाबाद: कन्नडचे अपक्ष आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात जाधव यांच्या गाडीची व घरांच्या काचांची नासधूस झाली आहे. हल्ल्याच्या वेळी 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

जाधव यांच्या समर्थ नगर येथील घरावर हा हल्ला झाला. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास काही तरुण तिथं आले आणि त्यांनी जाधव यांच्या घरावर दगडफेक केली. तसंच, त्यांच्या गाडीलाही लक्ष्य केलं.

हर्षवर्धन जाधव यांनी स्वत:चा शिवस्वराज्य पक्ष स्थापन केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामाही दिला होता. मात्र, तो स्वीकारण्यात आलेला नाही. ते पुन्हा एकदा कन्नड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी मंगळवारी चिंचोली लिंबाजी येथील सभेत बोलताना जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट होती. जाधव यांना प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. या प्रकरणी पोलीस तक्रारही करण्यात आली होती. जातीय भावना भडकावल्याचा गुन्हा जाधव यांच्यावर दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली होती. त्यानंतर रात्री हा प्रकार घडला....

फोटो - http://v.duta.us/b3fKYgAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/IumMPQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬