[aurangabad-maharashtra] - पाणीपुरवठा योजनेची जबाबदारी कोल्हेंकडे

  |   Aurangabad-Maharashtranews

\Bम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

\Bमहापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पाणीपुरवठा विभागात मोठे बदल केले आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करून घेण्याची जबाबदारी त्यांनी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यावर दिली आहे, तर शहरातील पाणी वितरणासाठी उपअभियंता आय. बी. खाजा यांना नियुक्त केले आहे.

औरंगाबाद शहरासाठी राज्य शासनाने १६८०कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेचे काम केले जाणार आहे. प्राधिकरणाने पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी सुमारे १३०० कोटींची निविदा काढली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कार्यालयीन आदेश काढून कामांची विभागणी केली आहे. आदेशात त्यांनी म्हटले आहे की, नवीन पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महापालिका यांची समन्वय समिती स्थापन होणार आहे. महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता हे समन्वय समितीचे प्रमुख राहतील. महापालिकेतर्फे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा समन्वय ठेवण्यासाठी व नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करून घेण्यासाठी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांना उपअभियंता किरण धांडे सहाय्य करतील. जायकवाडी ते नक्षत्रवाडी मुख्य योजनेचे संचलन, देखभाल दुरुस्तीचे काम कोल्हे यांच्याकडेच राहील असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शहरातील पाणी पुरवठ्याच्या वितरणाची जबाबदारी उपअभियंता आय. बी. खाजा यांच्यावर देण्यात आल्याचा उल्लेख आयुक्तांनी केला आहे. खाजा यांना कार्यकारी अभियंता म्हणून पदभार देण्यात आला आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/vgtGeQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬