[aurangabad-maharashtra] - रॅगिंगमुळे विद्यापीठाला मानवी हक्क आयोगाची नोटीस

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केवळ रॅगिंगमुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला मानवी हक्क आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक प्रमाणात रॅगिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी कबुली खुद्द कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बुधवारी (१६ ऑक्टोबर)दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासह विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. वाढत्या रॅगिंगच्या प्रकारांमुळेच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत नोंदवत डॉ. म्हैसेकर म्हणाले, मेडिकल कॉलेजांमध्ये रॅगिंगचे प्रकार नक्कीच वाढले आहेत आणि घाटीच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर यादेखील नुकत्याच अशा घटनांची चौकशी करुन आल्या आहेत. खरे म्हणजे पीजीचे विद्यार्थी रॅगिंग का करतात, असा प्रश्‍नही डॉ. म्हैसेकर यांनी यानिमित्ताने उपस्थित केला. या प्रसंगी उपअधिष्ठाता सर्वश्री डॉ. मोहन डोईबळे, डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. सुधीर चौधरी, विभागप्रमुख सर्वश्री डॉ. वर्षा रोटे, डॉ. सरोजिनी जाधव यांनी विविध अडचणी मांडल्या. या निमित्त वैद्यकीय शिक्षकांच्या कमतरतेकडे डॉ. येळीकर यांनी लक्ष वेधले. तसेच लवकरच विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रीय मूल्यमापनही केले जाणार असल्याचे सुतोवाचही डॉ. येळीकर यांनी केले. त्याचवेळी सर्वच विद्यार्थ्यांनी शारीरिक व्यायाम, खेळ आणि ध्यान, प्राणायाम व योगासनांना महत्व दिले पाहिजे; त्याशिवाय वाढत्या ताणतणावाला सामोरे जाणे कठीण आहे, असाही मौलिक सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/R3VVlQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬