[aurangabad-maharashtra] - सैन्य भरती प्रकरण; जामीन फेटाळला

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बंद पडलेल्या शाळेच्या बनावट टीसीच्या आधारावर दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून सैन्य भरतीसाठी बनावट प्रमाणपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील आरोपी उमेदवार परमेश्वर नागनाथ गिते याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी बुधवारी (१६ ऑक्टोबर) फेटाळला.

या प्रकरणी सैन्यभरती कार्यालयाचे कर्नल सावलशहा कलिया यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, भरती प्रक्रियेत सावलशहा यांच्याकडे नऊ जिल्ह्यातील सैन्य भरतीचे कामकाज होते व सैन्य भरतीसाठी २०१८मध्ये ऑनलाइन फार्म भरण्यात आले होते. यात मैदानी व लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांचे डोमिसाइल, जात प्रमाणपत्र, चारित्र प्रमाणपत्र, तसेच शैक्षणिक व इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती व यात २१ उमेदवारांनी वेगवेगळ्या जन्मतारखांची बोर्डाची बनावट प्रमाणपत्रे सादर करुन शासनाची फसवणूक केल्याचे आढळून आले होते. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. प्रकरणातील आरोपी परमेश्वर नागनाथ गिते (२५, रा. माळाकोळी, ता. लोहा, जि. नांदेड) याचे नेहरुनगर नागलगाव (ता. कंधार, जि. नांदेड) येथील ग्रामीण विद्यालयाचे २००४ सालचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र मिळाले होते. त्याबाबत पोलिस हे नोटीस तामील करण्यासाठी संबंधित शाळेत गेले असता शाळा १९८०-८२ मध्येच बंद झाल्याचे स्पष्ट झाले होते. याच दाखल्यावर आरोपीने पानभोसी (ता. कंधार, जि. नांदेड) येथील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळवल्याचे समोर आले. त्याआधारे पोलिसांनी तपास केला असता आरोपीची मूळ जन्मतारीख पाच नोव्हेंबर १९९४ असताना त्याने जन्मतारखेत २० जून १९९८ असा बदल करून बनावट टीसी सैन्य भरतीत सादर केल्याचे समोर आले. प्रकरणात अटक होऊ नये यासाठी आरोपी परमेश्वर गिते याने न्यायालयात अर्ज दाखल केला असता न्यायालयाने तो फेटाळला. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी काम पाहिले.

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/R1HzPAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬