[beed] - थकलेले लोक तुमचं भलं करू शकत नाहीत: मोदी

  |   Beednews

परळी (बीड): 'काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक स्वत:च थकल्याची कबुली देत आहेत. असे थकलेले आणि मनानं हरलेले लोक कोणाचंही भलं करू शकणार नाहीत,' असा टोला लगावतानाच, 'परळीतील निवडणुकीत यावेळी विजयाचे सर्व विक्रम मोडले जातील,' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज परळीत सभा घेतली. या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. मराठीतून भाषणाची सुरुवात करताना मोदींनी सर्वप्रथम उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. 'ही गर्दी पाहून विरोधकांच्या मनात धडकी भरली असेल,' असा चिमटा त्यांनी काढला. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा शब्दही त्यांनी दिला. मराठवाड्यात रस्ते, वीज व पाण्याची मोठी कामं सुरू आहेत. तब्बल २५ हजार कोटींची कामं सुरू आहेत. गोदावरीच्या खोऱ्यात पाणी आणण्याचा महायुतीचा प्रकल्प आदर्श ठरेल,' असा दावा मोदींनी यावेळी केला....

फोटो - http://v.duta.us/-D0leAEA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/NRLdGgAA

📲 Get Beed News on Whatsapp 💬