[kolhapur] - प्रचार झाला यूथफूल

  |   Kolhapurnews

कोल्हापूर टाइम्स टीम

मतांची गणित जुळवण्यासाठी महिला, ज्येष्ठ, युवा अशी विभागणी करत प्रचाराची आखणी केली जात आहे. युवा मतदारांची लक्षणीय संख्या पाहता रिंगणात उतलेल्या पक्ष व उमेदवारांकडून होणारा प्रचारही यूथफूल बनला आहे. युवकांच्या प्रश्नांवर जोर देत, युवकांच्या गरजपूर्तीचे आश्वासन देत व त्यांच्यासाठी सुविधांचा अजेंडा सादर करत प्रचाराला तरूण चेहरा देण्यासाठी युवा कार्यकर्त्यांची मोटही बांधली आहे. शिक्षण, रोजगार, सवलती, योजना, नोकरीच्या संधी या तरुणांच्या मागण्यांवर भर देत प्रचाराला रंगत आली असून युवकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम असलेल्या सोशल मीडियातून युवकांशी संवाद साधण्याचे कल्पक प्रयोग होत आहेत.

शैक्षणिक फी, शैक्षणिक धोरण, नोकरीच्या संधी, मंदीच्याकाळात नोकरीवर येणारी गदा व त्यातून निर्माण होणारे प्रश्न या युवकांच्या प्रश्नावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका करत प्रचार केला जात आहे. काँग्रेसचे दक्षिणचे उमेदवार ऋतुराज पाटील हे सर्वात तरुण उमेदवार असल्याने त्यांनी प्रचारातील बहुतांशी भर हा युवकांसाठी काय करणार यावर दिला आहे. युवकांना नेमके काय हवे आहे या धाग्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उमेदवार प्रचाराचे नियोजन करत आहेत. युवकांची साथ मिळवण्यासाठी त्यांच्या मनातील विकास जाणून घेणारी संपर्कयंत्रणाही महाआघाडी व युतीच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी कामाला लावली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/DXbY2QAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬