[kolhapur] - फॅशन्स, स्टाइल सजावटही ट्रेंडी

  |   Kolhapurnews

कोल्हापूर टाइम्स टीम

दिवाळी हा जसा दिव्यांचा सण तसाच खरेदीचाही सण. आठवड्यावर आलेल्या दिवाळीची चाहूल बाजारपेठेत सजलेल्या दुकानांनी आणि वेगवेगळ्या स्टाइलच्या ड्रेस, सजावटीच्या वस्तू, कलात्मक साहित्यांनी लागली आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये एक नवा ट्रेंड येत असतो आणि खरेदीच्या निमित्ताने तो व्हायरल होत असतो. यंदाही कपड्यांच्या फॅशन, स्टाइलपासून सजावटीच्या वस्तूंमध्येही हटके ट्रेंड पहायला मिळत आहेत.

मुलींच्या ड्रेसमध्ये लाँग वनपीस हिट

दसरा संपला की दिवाळीच्या कपडे खरेदीला वेग येतो. काहीजण दसऱ्यातच दिवाळीच्या खरेदीचा आनंद पूर्ण करतात. पण दिवाळीचा आदला आठवडा खरेदीसाठी दुकानं, मॉल, शोरूम्स पालथी घालण्यात वेगळीच मजा असते. सध्या हाच माहोल दिसत आहे. मुलींच्या ड्रेसमध्ये दरवर्षी एक कॉमन ट्रेंड येतो. कलरपासून स्टाइलपर्यंत असलेला हा ट्रेंड त्यावर्षीच्या दिवाळीचा फॅशन आयकॉनच ठरतो. यंदा लाँग वनपीस हिट असून त्यामध्ये सेंटरकट इनफॅक्टर आहे. दोन कॉन्ट्रास्ट कलरचा ट्रेंड सध्या फॅशनमंत्रा बनला आहे. नेट, प्युअरसिल्क व पेपरसिल्क या फॅब्रिकमधील वन पीसवर कांजीवरमची हेवीवर्क असलेली ओढणी या स्टाइलला मागणी असून खास पारंपरिक लूकसाठी यंदा हीच स्टाइल दिवाळीत दिसणार आहे. नेट वर्क तसेच स्कर्ट बॉर्डर डिझाइन हा ट्रेंडदेखील यावर्षी दिवाळीतील फॅशनफंडा बनणार असल्याचे बाजारपेठेतील फेरफटका मारल्यावर दिसत आहे. लाँग वन पीससोबत यावर्षी इंडोवेस्टर्न मेळ साधण्यासाठी प्लाझोची स्टाइलदेखील आहे. लाँग ए लाइन टॉपसह प्लाझो सलवार हा लूक अधिक स्टायलीश करण्यासाठी टॉपचे साइडकट लांब ठेवण्यात आले आहेत. यामध्ये रेडियम व ग्लॉसी कलरला मुलींची मागणी वाढत आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/taEp6wAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬