[kolhapur] - सहा माजी आमदार पुन्हा रिंगणात

  |   Kolhapurnews

Tweet:satishgMT

कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीत सहा माजी आमदार रिंगणात उतरले असून त्यांना तुल्यबळ विद्यमान आमदाराविरोधात टक्कर द्यावी लागली आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे, विनय कोरे, माजी आमदार के. पी. पाटील, पी. एन पाटील, राजीव आवळे, संजय घाटगे यांनी विजयासाठी अस्तित्व पणाला लावले आहे.

इचलकरंजी मतदार संघातून सलग आठव्यांदा प्रकाश आवाडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सातवेळा काँग्रेस पक्षाकडून लढणाऱ्या आवाडेंनी यंदा काँग्रेस जिल्हाध्यक्षदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. आवाडे यांच्या ४५ व्या वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांना तीनवेळा पराभव पत्करावा लागला असून चार वेळा ते विजयी झाले आहेत.

१९९५ पासून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे माजी जिल्ह्याध्यक्ष पी.एन. पाटील यांनी २००४ मध्ये फक्त एकदाच निवडणूक जिंकली. पण तत्पुर्वी झालेल्या दोन निवडणुकीत त्यांना शेकापचे संपतराव पवार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक आणि काँग्रेसनिष्ठ असलेल्या पाटील यांचा २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांनी पराभव केला. गतवेळच्या निवडणुकीत अवघ्या ७१० मतांनी पराभव झालेल्या पी.एन. यांनी नरके यांची हॅटट्रीक रोखण्यासाठी यावेळी कंबर कसली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/gXd11wAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬