[kolhapur] - ५६ इंच छातीने अर्थव्यवस्था सुधारत नाही

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केवळ ५६ इंच छाती असून चालत नाही तर त्यासाठी अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्याने कठोर उपाययोजनांची गरज असते', असा टोला माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी येथे बुधवारी लगावला. नोटबंदी आणि त्यानंतर घाईने घेतलेल्या जीएसटी अंमलबजावणीच्या निर्णयामुळे देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट बनल्याचा आरोपही सिन्हा यांनी पत्रकार बैठकीत केला.

डबघाईला जात असलेली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची गरज प्रतिपादित करून सिन्हा म्हणाले, 'देशापुढील आर्थिक संकट दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार अंमलबजावणी करावी लागेल. अन्यथा संपूर्ण देश डबघाईला येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एकखांबी नेतृत्वामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून तेच सर्वस्वी जबाबदार आहेत. तारतम्य न राखता गेली सहा वर्षे आर्थिक धोरणे राबवली गेली. त्याचा सर्वांत पहिला फटका कृषी क्षेत्राला बसला. त्यानंतर लघु व मोठ्या औद्योगिक क्षेत्रावर परिणाम झाला. मागणी, खरेदी, गुंतवणूक आणि निर्यातीवर परिणाम झाल्याने मंदीचा सामाना करावा लागत आहे. जीएसटी लागू करताना महसुलात १५ टक्के वाढ अपेक्षित होती. प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा पाच टक्के वाढही झाली नाही. जीएसटीतही वारंवार बदल केल्याने पायाभूत सुविधांवर परिणाम झाला.'...

फोटो - http://v.duta.us/5FC7UAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/Prg34gAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬