[mumbai] - आता रेल्वे पोलिसांनाही स्मार्ट कॅप

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

गेल्या दोन वर्षांपासून कॅपच्या प्रतीक्षेत असलेल्या रेल्वे पोलिसांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. पारंपरिक टोपी ऐवजी डोक्यावर घट्ट बसणारी गोल कॅप देण्याचा निर्णय मुंबई रेल्वे पोलिस प्रशासनाने घेतला आहे. या नवीन टोपीमुळे दैनंदिन कामकाजासह रेल्वे स्थानकातील गर्दी व्यवस्थापनाचे आव्हान पेलणाऱ्या पोलिसांना वेगळा लूक मिळाला आहे.

पोलिस कॉन्स्टेबल ते एपीआय अर्थात सहायक पोलिस उपनिरीक्षक यांना डोक्यावर घट्ट बसणारी कॅप देण्याचा निर्णय रेल्वे पोलिस प्रशासनाने घेतला. लाल आणि निळ्या रंगसंगती ही गोल टोपी आहे. टोपीच्या दर्शनी मध्यभागी 'महाराष्ट्र पोलिस' आणि 'बोधचिन्ह' असून दोन्ही बाजूला 'मुंबई रेल्वे' असे लिहिण्यात आले आहे.

साधारण दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलिस दलात पारंपरिक टोपीच्या जागी बेसबॉल कॅपचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. जुन्या टोपीत बंदोबस्त किंवा तपासकामे करत असताना डोक्यावर टोपी सावरत काम करावे लागत होते. याबाबत अनेक पोलिसांनी वरिष्ठांकडे या बाबत तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांच्या वर्दीत दोन वर्षांपूर्वी समावेश झालेली गोल टोपी आता रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील मिळणार असल्याने रेल्वे पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/Kq4WogAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬