[mumbai] - काँग्रेस कमकुवत झाल्यानेच भाजपला यश: ओवेसी

  |   Mumbainews

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईत आलेले एमआयएमचे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस संपण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्यात लढण्याची क्षमता उरलेली नाही. काँग्रेसची कमजोरी हेच भाजपचे यश आहे, अशा शब्दात ओवेसी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

काँग्रेस कमजोर झाली आहे. त्यामुळेच ड्रामा कंपनी (भाजप) यशस्वी होत आहे. काँग्रेसमध्ये लढण्याची क्षमताच उरलेली नाही, असं सांगतानाच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गैरकृत्ये प्रतिबंधक कायदा आणला. मोदी सरकारने हा कायदा बदलला आहे. त्यावेळी काँग्रेस कुठे होती? असा सवाल ओवेसींनी केला.

दहशतवादाच्या नावावर आता एक लिस्ट जारी करण्यात येणार आहे. त्यात ज्याचं नाव लिहिलेलं असेल त्याला दहशतवादी घोषित करण्यात येईल. त्याची जिंदगी बर्बाद होईल. दहशतवादी म्हणून घोषित झालेली व्यक्ती कोर्टातही दाद मागू शकत नाही. कोर्टात गेला तरी त्याला कोर्ट त्याला दहशतवादी घोषित करेल. अशा प्रकारचा कायदा आणला गेला आणि काँग्रेसने या कायद्याला पाठिंबा दिला, असं त्यांनी सांगितलं....

फोटो - http://v.duta.us/tSl-oAAA

येथे संपूर्ण कथा वाचा- - http://v.duta.us/jtbb0gAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬